सोपे शब्दकोडे
लीडरबोर्ड
पूर्ण लीडरबोर्ड →लोड होत आहे...
पहिली पातळी सोपी आहे. रोजच्या वापरातले दोन आणि तीन अक्षरी शब्द इथे आहेत, म्हणून नव्याने खेळणाऱ्यांनी इथूनच सुरुवात करावी. प्रत्येक चौकोनात एक अक्षर येतं. इंग्रजी अक्षरांत टाईप करा आणि मराठी अक्षर आपोआप उमटेल, उदाहरणार्थ tu टाईप केलं की तु दिसतं. सगळे शब्द बरोबर आले की कोडं आपोआप पूर्ण होतं आणि तुमचे गुण लीडरबोर्डवर नोंदवले जातात.
कोडं लोड होत आहे...
सोप्या कोड्यासाठी टिप्स
आधी ज्या सूचना लगेच कळतात ते शब्द भरा. एक शब्द भरला की त्याच्या अक्षरांमुळे आडव्या उभ्या शब्दांचे पहिले अक्षर मिळते आणि बाकीचे शब्द सोपे होतात. चौकोनावर दोनदा टॅप केलं की आडवे आणि उभे यांच्यात दिशा बदलते. एखादं अक्षर टाईप केल्यावर खाली दिसणाऱ्या पर्यायांमध्ये त, ट किंवा ल, ळ असे पर्याय दिसतात, तिथून हवं ते अक्षर निवडता येतं.
कोणतंही अक्षर अडलं तर अक्षर दाखवा हे बटण वापरा. त्यासाठी फक्त पाच गुण कमी होतात, पण कोडं पूर्ण होतं आणि पुढची पातळी उघडते.